Maharashtra Weather Update News AI Image
महाराष्ट्र

Rain Alert : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, 'या' १२ राज्यांना सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा

Maharashtra Weather Update News : बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीचा परिणाम देशभर जाणवत आहे. IMD ने १२ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला असून महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

  • IMD कडून १२ राज्यांना सतर्कतेचा इशारा

  • महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आता देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत पावसाने जोर धरला असून, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची स्थिती कायम आहे. आज तब्बल १२ राज्यांना IMD ने मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात २६ आणि २७सप्टेंबर रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. ईशान्येकडील नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दिल्लीला मध्यम पावसाचा इशारा

राजधानी दिल्लीमध्ये २६ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीचे किमान तापमान २४ अंश तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, २६ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली, तरी अनेक भागांत २८ सप्टेंबरपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.

महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती?

महाराष्ट्रात आजपासून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावत असणाऱ्या डीप डिप्रेशन चक्रीवादळामुळे हवामानावर परिणाम होत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुहू समुद्रकिनारी गणेश भक्तांची गर्दी, सुलभ शौचालय चालकाकडून भाविकांची लूट

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT