Maharashtra Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Pre-Monsoon Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या २४ तासात मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार; IMD अंदाज

Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या रविवारपासून राज्यातील अनेक भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे.

Satish Daud

दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामाला गती द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या रविवारपासून राज्यातील अनेक भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तुफान पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे.

या आठवड्याच्या शेवटी रायगड, रत्नागिरी, कोकण सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. येत्या १० मे पासून धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज आहे.

येत्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस (Rain Alert) कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान काही भागात गारपिट देखील होण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस?

येत्या २४ तासांत धुळे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, या भागात तुफान पावसाची शक्यता आहे. याशिवाय नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे ११ मे रोजी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा,छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT