Nagpur Temperature  saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: नागपूर बनलं 'हॉट स्पॉट'; ३ दिवसात ४४ अंश सेल्सिअसवर पोहचणार तापमानाचा पारा

Nagpur Temperature : उद्या आणि परवा विदर्भातील अकोला, यवतमाळ, नागपूरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता उन्हाच्या चटका वाढलाय. एप्रिल महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मध्य भारतापासून दक्षिणेपर्यंतच्या अंतर्गत भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. बंगालच्या उपसागरावरून बाष्पीयुक्त वारे वाहू लागल्यानं राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला होता. मात्र आता राज्यात उन्हाचा चटका वाढलाय.

विदर्भातील तापमान येत्या दोन तीन दिवसात ४४ अंश सेल्सिअसच्यावर जाणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात सध्या सामान्य तापामानापेक्षा तीन अंश सेल्सिअस जास्त तापमान आहे. विदर्भातील अनेक शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमान वाढलं आहे. अकोल्यात सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरातील तापमान ४० अंशाच्यावर गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.

उद्या आणि परवा विदर्भातील अकोला, यवतमाळ, नागपूरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचा धोका असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय. राज्यात आठवडाभर तापमान ३५ अंशापर्यंत खाली गेले होते. यामुळे हवेतदेखील काहीसा गारवा होता. आता मात्र तापमानात वाढ होतेय.

राज्यात अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. प्रामुख्याने धुळे, जळगाव, यवतमाळ, अकोला, अमरावती या शहरातील तापमान ४० अंशाच्यावर गेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात तापमानाचा पारा थेट ४२.४ अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. तर विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक ४३.२ तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घेण्याचे आवाहन येथील जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Bhakri Tips: तांदळाची मऊ, लुसलुशीत भाकरी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

Wedding Look: या लग्नसराईसाठी जान्हवीचे 'हे' देसी लूक ट्राय करा, तुम्हीही दिसाल ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह

SCROLL FOR NEXT