IMD issues orange alert for Konkan coastal districts of Maharashtra saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्गसह कोल्हापूर घाट भागात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

Bharat Jadhav

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर उद्या उंच लाटा उसळतील असा इशारा देण्यात आलाय. या लाटा ३.६ ते ४.३ मीटर उंच असणार आहेत. २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० पासून ते २४ जुलै २०२५ रात्रौ ८.३०पर्यंत लाट उसळतील. त्याचप्रमाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रोजीचे रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच उसळतील असा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. (IMD Issues Orange Alert High Waves and Dangerous Conditions Predicted Along Maharashtra’s Konkan Coast)

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अलर्ट देण्यात आल्यानं जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात ११७.८ मी.मी. पाऊस झाला. या पावसामुळे मौजे हदगाव नखाते, येथील सात ते आठ जण पुराच्या पाण्यात अडकले. पुराच्या पाण्यापासून जीव वाचण्यासाठी ते घराच्या छतावर जाऊन बसले होते. आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. तसेच बाधित नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे बरडा येथेही तीनजण पुराच्या पाण्यात अडकले होते. मंदिराच्या चहु बाजुने पाणी भरले होते. त्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मंदिराचा आसरा घेतला होता. स्थानिक बचाव पथकाने त्यांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : क्रिकेटच्या इतिहासात जे घडलं नव्हतं ते मँचेस्टर कसोटीत घडलं; गंभीर-गिलच्या निर्णयानं सगळेच हैराण, नेमकं झालं तरी काय?

Pune : चारित्र्याच्या संशयावरुन गरोदर पत्नीच्या पोटात ठोसा मारला, पतीने केलेल्या मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरात जोरदार पाऊस

Maharashtra Politics: शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नजर; अंतिम मंजुरीसाठी फडणवीसांचीच लागेल सही

South India Rice Dishes: साधा भात खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा 'हे' साऊथ इंडियन टेस्टी राईस डिशेस

SCROLL FOR NEXT