IMD Rain Alert in Maharashtra  Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: महाराष्ट्रासह १३ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

Weather Update Today: ढगाळ वातावरणामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

Weather Update 5 February 2024

वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा कोणत्याही ऋतूचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. एकीकडे देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती उद्भवली आहे. ढगाळ वातावरणामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित भागात थंडी कायम राहिल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिल्ली, हरियाणा, पंजाब, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम येथे अवकाळी पावसाच्या सरी (Heavy Rain) बरसत आहे. त्यामुळे वातावरणात मोठा गारवा निर्माण झालाय. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहिल, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

येत्या २४ तासांत या भागात कोसळणार पाऊस

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत, पश्चिम हिमालयात काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल, असेही हवामान खात्याने म्हंटले आहे.

त्याचबरोबर उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. पूर्व आसाममध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

SCROLL FOR NEXT