Heat Wave Alert saam tv
महाराष्ट्र

Weather Update : पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार, उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Heat Wave Alert : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Satish Daud

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील आणखी काही दिवस याचा त्रास होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली. धुळ्यात तापमानाचा पारा चाळीशीपार गेला होता. मुंबईतही दिवसभर दमट वातावरण होते. त्यामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. अनेकांना या उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी ३५ ते ४० किमी वेगाने उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहे. दणिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे.

परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. गुरुवारी (ता. २२) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडून गेली आहेत. हवामान खात्याने गुरुवारपासून पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

September Born People: सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Manoj jarange patil protest live updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन-जपान दौऱ्यानंतर भारतात पोहोचले

Manoj Jarange : पाणीही न पिणाऱ्या जरांगेंनी खरंच समोसा खाल्ला? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Manoj Jarange : माझं ऐकायचं नाही, त्यांनी...; मनोज जरांगेंनी आंदोलकांना सुनावलं, VIDEO

Maratha Reservation: खाऊगल्ली का बंद होती? व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यावरुन मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT