Rain News in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता; वाचा कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

IMD Rain Alert : उकाडा तसेच उष्णतेच्या झळा सोसणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे.

Satish Daud

उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात तापमानाचा पारा काहीसा कमी झाला असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी (ता. २ जून) आणि उद्या सोमवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. येत्या १० जूनपर्यंत मौसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची मशागत कामे आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीपार गेला आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी उष्णता अधिक वाढत असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं आहे. शनिवारी राज्यात ब्रह्मपुरी येथे ४६.०°C कमाल तापमानाची नोंद झाली.

तर धाराशिव येथे २३.०°C तापमान नोंदवले गेले. हे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील सर्वात कमी किमान तापमान होते. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांत आज आणि उद्या उष्ण आणि दमट वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

दुसरीकडे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT