Rain In Maharashtra Saam Digital
महाराष्ट्र

Weather Alert Today: अकोल्यात अवकाळी पावसाने लावली हजेरी, विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा इशारा

IMD Rain Alert: अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं चांगलच झोडपल आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय गवळी

Akola Unseasonal Rain:

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं चांगलच झोडपल आहे. तर अकोला शहरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. आज रात्री 8 वाजेपासून जिल्ह्यातील उरळसह गावात अवकाळी पावसान हजेरी लावली आहे.

ग्रामीण भागात सध्या हरभरा सोंगणीला आला आहे. जेमतेम सोंगणीला सुरवात होणार तोच विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळ पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र राज्यातल्या काही भागात अचानक थंडी गायब झाली आहे. वाढत्या उन्हाच्या चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. तर काही दिवसांपूर्वी विदर्भातल्या काही जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिला होता. या अचानक झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठं नुकसान झालं असल्याचे अनुमान लावले जात आहे. (Latest Marathi News)

हवामान खात्याने पुन्हा राज्यात पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळ विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता.

त्यानूसार आज 15 फ्रेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजतापासून अकोला जिल्ह्यातील बाळापूर, वाडेगाव, उरळ तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुसरीकडे अकोला शहरात काही भागात तूरळक पाऊस झाला असून यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोंगणीला आलेल्या हरभऱ्याचं नुकसानं झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT