weather Update 12 december cold wave alert for delhi IMD Issues Rainfall For Maharashtra Tamil Nadu kerala sikkim Saam TV
महाराष्ट्र

Weather Update: उत्तर भारतात थंडीची लाट, पण 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

Maharashtra Weather Report: मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा प्रभाव, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. काही भागात अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत.

Satish Daud

Maharashtra Weather Update

मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा प्रभाव, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. काही भागात अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत. दरम्यान, एल-निनोच्या प्रभावामुळे वातावरणात असाच बदल होत राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आली असली, तरी काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिसेंबर महिन्याच्या थंडीला सुरुवात झाली असली तरी, यावर्षी देशात थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. सध्या दिवसा थंडी वाजत असून, त्यामानाने पहाटेचा गारवा कमीच राहणार आहे, पुढील काही दिवस देशात असंच वातावरण राहणार असल्याचंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

उत्तर भारतात थंडी वाढणार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश राज्यांच्या कमाल आणि किमान तापमानात सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत मागील दोन दिवस सर्वात थंड होते. १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण उत्तर भारताच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

ईशान्येकडील राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची आणि तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दुसरीकडे सिक्कीममध्ये १२ डिसेंबरला काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिणी तामिळनाडू, दक्षिणी केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदललं होतं. पण, आता पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT