Maharashtra Weather Forecast Today saam tv
महाराष्ट्र

Weather Forecast Today: विदर्भावर पुन्हा गारपीटीचं संकट! येत्या २ ते ३ दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast Today: विदर्भात पुढील पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पावसाचे सावट आहे. 27 एप्रिल पर्यंत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Vidarbha Weather Forecast Today: राज्यात पुढील 5 दिवस विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त वर्तवला आहे. या सर्वाधिक फटका विदर्भाला बसणार असून विदर्भातील काही भागांत गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वीजा लखलखताना शक्यतो बाहेरची कामे टाळा किंवा योग्य निवारा बघा असे आवाहन करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

विदर्भात पुन्हा गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातत विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या २ ते ३ दिवसांत तुरळक ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विदर्भात पुढील पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पावसाचे सावट असून 27 एप्रिल पर्यंत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे विदर्भातील तापमानात 5 ते 6 घसरण होईल अशी शक्यता आहे.

यामुळे 42 अंशावर गेलेले तापमान 35 अंशापर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवस कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Forecast)

राज्यात काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वारा आणि विजांमुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या आणि जीवतहानीच्या घटना समोर आल्या. दरम्यान आता विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT