weather Alert Heavy Rain of Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : विदर्भ-मराठवाड्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; मुंबईतही तुफान पाऊस कोसळणार, IMD कडून अलर्ट

Maharashtra Weather Update : दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Satish Daud

पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांनी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पेरणीची कामे पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचं चांगलंच टेन्शन वाढलं होतं.

मात्र, शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस (Rain Updates)  झाला. त्यामुळे तुर्तास तरी शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं आहे. अशातच पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

भारतीय हवामान खात्याने (IMD Weather Alert) जारी केलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तर उद्या म्हणजेच सोमवारी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह  पावसाची शक्यता (Rain Updates) आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा इशारा

काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक धुळे आणि नंदुबार जिल्ह्यांत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईसह उपनगरात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढणार

रविवारी पहाटे पावसाने आणखीच जोर पकडला आहे. येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण नवी मुंबईसह परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असं आवाहनही हवामान खात्याने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजितदादांना भरसभेत ‘I Love You’ म्हणणारा कार्यकर्ता ढसाढसा रडला; म्हणाला, दादांना मेसेज पाठवला अन्...VIDEO

Shocking: हादरवणारं दृश्य, नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये, ३ मुलं...त्या भयाण रात्री घरात नेमकं काय घडलं?

Wedding Hair Style: लग्नसराईसाठी साडीवर या ५ सुंदर आणि ट्रेंडिंग हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

Evening Yoga Tips : योगा संध्याकाळी करावा की नाही?

Maharashtra Live News Update : अजित पवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत २ राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला - अंकुश काकडे

SCROLL FOR NEXT