Mandous Cyclone Latest Updates : Saam TV
महाराष्ट्र

Mandous Cyclone : मंदोस चक्रीवादळमुळे महाराष्ट्रावर अस्मानी संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असं नाव दिलंय. आज हे चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mandous Cyclone Latest Updates : मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होत आता या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असं नाव दिलंय. आज हे चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Latest Marathi News)

चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ६५ किमी प्रतितास ते ८५ किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंदोस चक्रीवादळ हे दक्षिण-पश्चिम आखातावर चक्रीवादळ सरकत आहे.

त्यामुळं कावेरी डेल्टा प्रदेशातील नागापट्टिनम आणि तंजावर तसेच चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Weather Updates)  पडू शकतो. दुसरीकडे या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना देखील बसणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात मुंबई आणि ठाणेसह इतर उपनगरामध्ये १२ डिसेंबर रोजी अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची  (Rain Alert) शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२, १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT