pandharpur, Coronavirus , Covid-19 saam tv
महाराष्ट्र

Video पाहा : महाराष्ट्रात Corona चा विळखा; Pandharpur च्या विठुरायाच्या दर्शनाला निघालात ? थांबा ! नवा नियम वाचा

मंदिर व परिसरातील स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे.

भारत नागणे

Pandharpur News : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने (vitthal rukmini mandir samiti) दर्शनासाठी येणा-या भाविकांना मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे. (Maharashtra News)

कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यातील सातारा आणि सांगली जिल्ह्यात शासकीय कार्यालयांत मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच सार्वजिनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहर व तालुक्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिरात येताना मास्कचा जरुर वापर (wearing of mask is mandatory in shri vitthal rukmini mandir in pandharpur) करावा असे आवाहन समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

राज्य शासनाकडून मंदिरात मास्क सक्ती करण्याच्या कोणत्याही सचूना प्राप्त झाल्या नाहीत. तरीही खबरदारी म्हणून भाविकांना मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे. मंदिरातील भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करता, मंदिर व परिसरातील स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दिवसातून तीन ते चार वेळा देवाचा गाभारा व मंदिरातील दोन्ही सभामंडप स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. भाविकांनी मंदिरात येताना स्वच्छतेबरोबरच सामाजिक अंतर ठेवून दर्शन घ्यावे असे आवाहनही मंदिर समितीने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT