कौतुकास्पद! चक्क 51 दिवसात घेतले 51 लाखांचे उत्पन्न भारत नागणे
महाराष्ट्र

कौतुकास्पद! चक्क 51 दिवसात घेतले 51 लाखांचे उत्पन्न

51 दिवसात 51 लाखाचे कलिंगडांच्या लागवडीतून उत्पन्न घेण्याची किमया तांदुळवाडीच्या सुनील चव्हाण या शेतकऱ्याची केली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : पारंपारिक ऊस, केळी या पिकांना बगल देत माळशिरसMalshirasतालुक्यातील तांदुळवाडीTandulwadi येथील सुनील चव्हाणSunil chvhan या शेतकऱ्याने कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पाणी,खते आणि वेळेवर किडनाशक फवारणींचे योग्य नियोजन करुन त्यांनी सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या दर्जेदार कलिंगडाला तब्बल 34 रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे. लागवडी पासून ते काढणी पर्यंतच्या 51 दिवसांमध्ये त्यांना 51 लाखाचे उत्पादन मिळाले आहे. त्यांचा निर्यातक्षम कलिंगड शेतीचा हा प्रयोग इतर शेतकर्यांसाठी आदर्श ठरला आहे.Watermelon yielded Rs 51 lakh in 51 days

सुनील चव्हाण यांनी जून महिन्यात सहा एकर क्षेत्रामध्ये 35 हजार कलिंगड रोपांची लागवड केली होती.watermelon Planting लागवडीपूर्वी शेतीची मशागत करुन शेणखत वापरले होते. शिवाय सोबतच ठिबकसिंचनही केले. खते,पाणी आणि किड रोग नियंत्रण फवारण्यांचे योग्य नियोजन केल्यामुळे त्यांना सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले. त्यांचे चवदार कलिंगड परदेशात निर्यात होणार असून तेथील खवय्यांना कलिंगडाची चव चाखायला मिळणार आहे.

दोन दिवसापूर्वी चव्हाण यांच्या कलिंगडाची तोडणी करण्यात आली. 2 किलो पासून 8 किलो वजना पर्यंतच्या कलिंगडाची विक्री केली. जागेवरती 34 रुपये किलोचा भाव मिळाला. एकर कलिंगडासाठी त्यांना चार लाख रुपयांचा खर्च आला. खर्च वजा जाता त्यांना तब्बल 47 लाख रुपयांचा नफा मिळाला. गेल्या तीन वर्षापासून सातत्याने ते कलिंगडाची लागवड करतात. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे जेमतेम 10 ते 20 रुपये दर मिळाला होता. यावर्षी मात्र त्यांना कलिंगड पिकातून बंफर लॉटरी लागली आहे. तब्बल 34 रुपयांचा दर मिळाला आहे. कलिंगड पिकाचे योग्य नियोजन, सातत्य आणि बाजारपेठेचा अनुभव गाठीसी असला की शेती पिकातून चांगले उत्पन्न मिळवता येते, हेच सुनील चव्हाण या तरुण शेतकर्यांना आपल्या कलिंगड शेतीच्या प्रयोगातून सिध्द करुन दाखवले आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देव दिवाळीला काळाचा घाला, हावडा एक्सप्रेसने रेल्वे रूळ पार करणाऱ्यांना उडवले, ८ महिला भाविकांच्या चिंधड्या

Health Department Recruitment: सार्वजनिक आरोग्य विभागात सर्वात मोठी भरती! १४४० पदांसाठी रिक्त जागा; पगार १.७७ लाख; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच खेडमध्ये जंगी स्वागत

IIT Research Diabetes : मधुमेहिंसाठी आशेचा किरण! किडणी विकाराचे आता लवकर निदान होणार | VIDEO

Comet AI ब्राउझरला धक्का! Amazon ने Perplexity ला फीचर थांबवण्याची दिली नोटीस

SCROLL FOR NEXT