Satara, Rain, Koyna Dam, Nira River saam tv
महाराष्ट्र

Satara : नीरा नदीच्या पूलावरुन वाहतूक बंद; काेयनेतून दहा हजार क्यूसेक विसर्ग हाेणार

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यास पावसानं झाेपडलं आहे.

ओंकार कदम, Siddharth Latkar

Koyna Dam Latest Marathi News : सातारा जिल्ह्यास गेल्या चार दिवसांपासून पावसानं झाेडपलं आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसामुळं नदी नाले भरुन वाहू लागले आहेत. दरम्यान लोणंद -वीर-सासवड रस्त्यावरील वीर धरणाच्या खालच्या बाजूचा नीरा नदी वरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. तसेच आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे एक फुटाने उघडले जाणार आहेत अशी माहिती (satara) जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने पूर्वनियोजनानुसार आज सकाळी दहा वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे एक फुट सहा इंच उघडून 8000 क्युसेक विसर्ग सोडणेत येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान सध्या वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 900 क्यूसेक व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 क्यूसेक विसर्ग नदीपत्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 32459 क्यूसेक विसर्गात वाढ करून 41733 क्यूसेक इतका सुरु करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो असेही प्रशासनाने कळविले असून नदीकाठच्या ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन केले आहे.

धोम धरणाच्या आसरे बोगद्यातून शंभर क्यूसेक विसर्ग धोम बलकवडी उजवा कालव्यातून पुराचे पाणी सोडण्यात आले. तसेच दुपारी दाेन नंतर धोम धरणाचे पाॅवर हाऊस व सांडव्या व्दारे कृष्णा नदीत सुरूवातीला एकूण चार हजार क्यूसेक विसर्ग सोडण्यात येईल. तसेच धोम धरणातील आवक नुसार विसर्गामध्ये वाढ करण्यात येऊ शकते असे प्रशासनाने कळविले आहे.

कुडाळी मध्यम प्रकल्प महू धरण पाणलोट क्षेत्रामधील संततधार पावसामुळे महू धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. धरणाची वक्र द्वारे बंद करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरुन प्रवाह सुरु होऊ शकतो. कुडाळी नदी काठावरील लोकांनी नदी पात्रामध्ये प्रवेश करु नये तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT