Water Shortage Saam TV
महाराष्ट्र

Water Shortage : १३ दिवसांपासून पाण्याची बोंबाबोंब; हांडे घेऊन महिलांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

Chhatrapati Sambhaji Nagar : काही दिवसांपूर्वी नवीन जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. गेल्या 12 दिवसापांसून पाण्याचा ठणठणाट असून आजही परिस्थिती कायम आहे.

साम टिव्ही ब्युरो

रामू ढाकणे

Water Shortage :

छत्रपती संभाजी नगरमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पुंडलिक नगर आणि गारखेडा परिसरात 12 ते 13 दिवस उलटूनही पाणी आलेलं नाही. शहरात पाणीच नसल्याने या भागातील नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय.

यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केलाय. परिणामी या भागातील नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकरद्वारे पाणी मागण्याची वेळ आलीये. यासाठी देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुटही होत आहे. त्यामुळे या भागातील महिला प्रचंड आक्रमक झाल्यात.

काही दिवसांपूर्वी नवीन जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. गेल्या 12 दिवसापांसून पाण्याचा ठणठणाट असून आजही परिस्थिती कायम आहे. त्यावेळी महिलांनी हाहात हंडे घेऊन पाण्याची टाकी गाठलीये. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा यावेळी महिलांनी दिलाय.

एकीकडे महापालिका आयुक्त छत्रपती संभाजी नगरला स्मार्ट सिटी म्हणतात. मग या स्मार्ट सिटीमध्ये बारा- तेरा दिवस पाणी येत नाही मग ही कसली स्मार्ट सिटी? असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केलाय. पाणी नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय.

पाण्यासाठी महिलांचा हंडा घेऊन रास्ता रोको आंदोलन

नाशिकच्या नांदगाव शहरात देखील पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. शहरातील मल्हारवाडी व परिसरात गेल्या ४५ दिवसांपासून नागरीकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून या भागाला पाणी पुरवठा माणिकपुंज धरण, गिरणा धरण यातून पाणी पुरवठा होते.

मात्र कधी पीप लाईन फुटणे तीची दुरुस्ती यामुळे या परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी पाण्याचे हंडे घेत नांदगाव-येवला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले,त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.अखेर पोलिस प्रशासन व नपा प्रशासनाने उद्या संध्याकाळ पर्यंत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्या नंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT