water scarcity in hanumant javalga near latur Saam Digital
महाराष्ट्र

Latur Water Crisis: पाण्यासाठी अख्ख गाव काढतय रात्र जागून, लातूर जिल्ह्यात भीषण स्थिती, Video

water scarcity in hanumant javalga near latur : गावकऱ्यांनी आता गावात खाजगी पाण्याचा टँकर लावला आहे. मात्र तो देखील वेळेवर येत नसल्याने गावकऱ्यांना रात्रभर पाहण्यासाठी जागं राहावे लागत आहे.

Siddharth Latkar

- संदीप भोसले

लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील हनुमंत जवळगा गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावात पाणी नसल्याने महिलांसह लहान मुलांना रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या टँकरची वाट पाहत रांगेत उभं राहावं लागत आहे. हे चित्र आता बहुधा पावसाळ्यापर्यंत राहणार असं दिसून येत आहे.

लातूर जिल्ह्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावात पाण्यासाठी नागरिकांनी आंदाेलन केले. परंतु पाणी पूरवठा याेग्य नसल्याने नागरिक संतप्त हाेताहेत. अनेकांना पाण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे.

यापूर्वी देखील पंचायत समितीत गावकऱ्यांनी पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र तरी देखील गावात पाणी येत नसल्याने गावकरी नाराज झाले आहेत. गावकऱ्यांनी आता गावात खाजगी पाण्याचा टँकर लावला आहे. मात्र तो देखील वेळेवर येत नसल्याने गावकऱ्यांना रात्रभर पाहण्यासाठी जागं राहावे लागत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची तात्काळ मदत

Fuel Price Hike : देशात विमान सेवा बंद होणार? एअरलाईन्स अडचणीत, एअर इंडियाचे थेट सरकारला पत्र; जाणून घ्या कारण

Abhishek Bachchan : अभिषेकने खोटी अंगठी घालून केलं होत ऐश्वर्या रायला प्रपोज, बच्चन कुटुंबाच्या लेकावर 'अशी' वेळ का आली?

IPL मध्ये नवा वाद! राजस्थानचा कर्णधार सामना सुरू असताना ओढतोय सिगारेट; व्हिडिओने खळबळ

SCROLL FOR NEXT