भंडारदरा धरण 
महाराष्ट्र

पाणी पुन्हा पेटणार, नाशिकची कार्यालये मराठवाड्यात जाणार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः मराठवाडा आणि नाशिक-नगर असा पाण्यासाठी सातत्याने संघर्ष होत आला आहे. आता या संघर्षाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता आहे. याला कारणीभूत आहे मोदी सरकारमधील मंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांचे वक्तव्य.

नाशिकमधील जलसंपदा कार्यालये औरंगाबाद व वैजापूर येथे हलवण्याचा घाट घातला जात आहे. ही कार्यालये तिकडे गेल्यास नगर आणि नाशिकच्या शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नाही. Water Resources Department offices in Nashik will be shifted to Aurangabad

या कार्यालय हलवण्याच्या प्रयत्नांना खीळ न घातल्यास दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत बोलताना, नाशिक येथील जलसंपदा कार्यालये औरंगाबाद व वैजापूर येथे हलविण्याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे सूतोवाच केले. वरच्या बाजूच्या भाम, भावली, वाकी व मुकणे या मराठवाड्यासाठी असलेल्या धरणांतील पाणी पिण्याच्या नावाखाली तिकडे शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे या धरणांच्या पाण्याचे नियंत्रण मराठवाड्यातील वैजापूर पाटबंधारे कार्यालयाकडे देण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रत्यक्षात भाम, भावली व वाकी या तीनही धरणांना कालवे नाहीत. त्यांचे पाणी दारणा धरणात आणून ते जलद कालव्याद्वारे मराठवाड्याला दिले जाते. मुकणे धरणातील साडेचार टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी, तर अडीच टीएमसी पाणी गोदावरी कालव्यांसाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत सिंचन नियंत्रण वैजापूरला गेले तर दारणाचे, म्हणजेच गोदावरी कालव्यांचे सिंचन व्यवस्थापन वैजापूर कार्यालयाकडे आपोआप जाईल. Water Resources Department offices in Nashik will be shifted to Aurangabad

कारण नसताना गुंतागुंत व प्रादेशिक संघर्ष वाढेल. या वरच्या बाजूच्या धरणांचे पाणी पिण्याच्या नावाखाली शेतीसाठी वापरले जाते, अशी चुकीची माहिती मंत्री कराड यांना देण्यात आली आहे. उलट, गेल्या दहा वर्षांत गोदावरी कालव्यांच्या आवर्तनांची संख्या कमी झाली आणि पाण्याअभावी खरीप, रब्बी व उन्हाळी हे तीनही हंगाम संकटात आले आहेत. याउलट, मराठवाड्यातील आठमाही जायकवाडी धरणाच्या पाणीफुगवट्यावर सव्वा लाख हेक्टर क्षेत्रात बारमाही उसाची शेती फुलली आहे. तेथील पाणीफुगवट्यासाठी स्वतंत्र वीज फिडर टाकण्याची मागणी मुद्दाम टाळली जाते.Water Resources Department offices in Nashik will be shifted to Aurangabad

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनुभाऊची मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

Maharashtra Live News Update: शिर्डी पुन्हा हादरली; भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

SCROLL FOR NEXT