Igatpuri Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Igatpuri Water Shortage: इगतपुरीत भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल पायपीट

Igatpuri Water Shortage: धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News: धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरण उशाला आणि कोरड आदिवासी बांधवांच्या घशाला अशी परिस्थिती इगतपुरी तालुक्यात पाहायला मिळते. हंडाभर पाण्यासाठी आदिवासी भागातील महिलांना मैलोमैल पायपीट करावी लागत आहे. (Latest Marathi News)

भावली धरणाजवळ असलेल्या कुरुंगवाडी गावातील आदिवासी महिलांची घोटभर पाण्यासाठी सुरू असलेली ही कसरत.. पिण्यासाठी पाणी नसल्यानं अगदी दोन दोन किलोमीटर पायपीट करून डोंगरदऱ्यात कुठे तरी डबक्यात साचलेल गढूळ पाणी या महिलांना भरावं लागत आहे. जे पाणी शहरातील लोकं अजिबात वापरणार नाही, ते गढूळ पाणी पिण्याची वेळ कुरुंगवाडीच्या ग्रामस्थांवर आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील या परिसरातील धरणांच्या पाण्यावर मुंबईकरांची तहान भागते, मात्र जिथं ही धरणे आहेत, तिथल्या आदिवासी बांधवांनाचं पाण्यासाठी अशी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनानं या आदिवासी बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते हे पाहावे लागणार आहे.

पुण्यातही पाणी टंचाई

पुणे जिल्ह्यातील गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . जिल्ह्यातील २४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे गावात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. भोर ,आंबेगाव ,जुन्नर आणि खेड तालुक्यातील गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

गावांमधील ४० हजार नागरिकांसाठी २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये एप्रिल पासून पाणीटंचाईचा संकट आहे . पुणे जिल्ह्यात २० टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिकलेल्या केळीपासून 5 मिनिटांत बनवा 5 चविष्ट रेसिपी, बच्चेकंपनी आवडीने खाईल

Maharashtra Politics: भास्कर जाधवांचा सूचक WhatsApp स्टेटस, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मान्सूनचे आगमन

Income Tax Return: करदात्यांसाठी मोठी बातमी! ITR भरला पण हे काम विसरलात? लगेचच पूर्ण करा प्रोसेस, शेवटची तारिख आली समोर

Super El Nino: चिंता वाढली! जगावर 'सुपर एल निनो'चं महासंकट, NASAचा धडकी भरवणारा फोटो; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT