Shrikant Shinde: मला अजून उलगडायला लावू नका...; कॉन्ट्रॅक्टरच्या टीकेवर श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना अल्टिमेटम

Shrikant Shinde On Aditya Thackeray:आदित्य ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे.
Aditya Thackeray-Shrikant Shinde
Aditya Thackeray-Shrikant ShindeSaam Tv

Political News : पावसाळ्यात मुंबई आणि रस्त्यांवर असणारे खड्डे यांचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यावरून आता आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांमध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईत रस्ते काँक्रीटीकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकार हे बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. (Latest Marathi News)

सोन्याचा चमचा घेऊन आले

कॉन्ट्रॅक्टरची भाषा काही लोकं करत आहेत. सोन्याचा चमचा घेऊन काही लोकं आले आहेत. त्यांना बरोबर रेट माहीयेत. कॉन्ट्रॅक्टरची भाषा त्यांना माहीत आहे. कारण 25 वर्षे त्यांनी तेच केले आहे. मला अजून उलगडायला लावू नका, असा इशारा श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

Aditya Thackeray-Shrikant Shinde
Uttar Pradesh Crime : सावधान! तुमचा बॉयफ्रेंडही असं करू शकतो; लग्नाआधीच सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला

मुख्यमंत्री महाराष्ट्रात लक्ष देत आहेत. कुठलाही भाग दुर्लक्षित होऊनये, विदर्भाला सुद्धा न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत. लोकांना जे हवं होतं ते सरकार स्थापन झालं आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलं. वातावरण बदलले आहे. त्यामुळे लोकांना हे आपलं सरकार वाटतं आहे. लोकांना सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत, असंही श्रीकात शिंदे यावेळी म्हणाले.

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित राहिला आहे. या घटनेत ठाकरे गटाने न्यायालयात देखील धाव घेतली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे. याविषयी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी जयंत पाटीलावरही टीका केली आहे. निकाल लागल्यावर सर्व ढोल जोशे बंद होतील असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देत काही लोकं रात्री स्वप्न बघतात आता काही लोकं दिवसाही स्वप्न बघायला लागले आहेत, असं वक्तव्य श्रीकातं शिंदे (Shrikant Shinde) यांनी केलं आहे.

Aditya Thackeray-Shrikant Shinde
Crime News : ऑनलाइन गेमने तरुणाचा घेतला जीव; धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं

सत्याच्या बाजूने निकाल लागेल. आम्हाला सुप्रिया कोर्टाची (Supreme Court) धास्ती नाही. आज जे केले आहे ते तंतोतंत आम्ही पाळले आहे. त्यामुळं भीती नाही, असं ठापपणे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com