Akola Water Scarcity Saam Tv
महाराष्ट्र

Akola Water Scarcity : पाणी टंचाईचे भीषण वास्तव; गावातील मुलांची लग्न रखडली

Akola Water Crisis News : अकोला जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Water Scarcity News : अकोला जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बाळापूर तालुक्यातील कवठा गावात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कवठा गावातच धरण असतांना देखील गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे येथील मुलांना लग्नासाठी मुलगी मिळे ना.  (Latest Marathi News)

सकाळ झाली की येथील गावकऱ्यांना एकच चिंता सतावते ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची. जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने पंचाळिशी ओलांडली आहे. पण या वाढत्या तापमानातही हे गावकरी दैनंदिन लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी (Water Scarcity) गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मन नदीच्या पात्रात करण्यात आलेल्या झिऱ्यातून पाणी काढतात. या दूषित पाण्यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. आपली सर्व कामे बाजूला टाकत दोन घोट पाण्यासाठी हे गावकरी रोज पायपीट करतात. (Akola News)

गावातील मुलांची लग्न रखडली

दरम्यान गावकऱ्यांनी सांगितले की, गावात पाण्याची समस्या असल्याने बाहेर गावातील लोक आपल्या मुलीचे लग्न या गावात करू इच्छित नाहीत. जर मुली दिल्या जातात तर अनेक अटीशर्ती मुलांसमोर समोर ठेवल्या जातात. या समस्येबाबत अनेकदा ग्रामपंचायतमध्ये ठराव मांडला गेला आणि प्रशासनाकडे पाठपूरवठा केला. पण अजूनही समस्येवर तोडगा निघाला नाही, असे ग्रामपंचायत सदस्य सांगतात.

कवठा या गावांमध्ये शासनाने पाण्यासाठी उपाययोजना दिल्या आहेत, मात्र त्या नागरिकांना उपयोगी ठरतात दिसत नाहीत. शासनाने आधीच दिलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेवर आरो वॉटर फिल्टर बसवलं तर नागरिकांना विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरता येईल, आणि अनेक वर्षांपासून पाण्यासाठी होणारी पायपीट थांबू शकणार.

कवठा येथे विदर्भ पाटबंधारे विभागाचे वतीने बॅरेजचे रखडलेले काम सन २०१५ पासून सूरू करण्यात आले होते व सध्या काम अंतीमटप्प्यात आहे. तर डिसेंबर २०१७ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले होते.

या धरणामध्ये जुलै २०१८ मध्ये २ मीटर पाणी अडविण्यात आले होते व सध्याही या धरणात पाणी आहे. या धरणाकरिता कवठा येथील शेकडो एकर जमीन भुसंपादित करण्यात आली. अनेक शेतकरी भुमीहीन झाले. मात्र, पिण्याच्या पाण्याची गावकर्‍यांची धडपड कायम आहे.

त्यामुळे गावात धरण असताना देखील गावकऱ्यांच्या घशाला कोरड आहे. धरणातील पाणी गावाला मिळावे व पाणीसमस्या कायमस्वरूपी मिटावी अशी आस लावून गावकरी या धरणाकडे पाहत आहेत. जनतेला भीषण पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी बोअर अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता मात्र यावर्षी बोअर अधिग्रहानवर ही संकट आले असून जलस्वराज, महाजलसारख्या ग्रामीण पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना केवळ कागदोपत्रीच आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला रणरणत्या उन्हात वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. झिऱ्यातून पाणी काढून दूषित पाण्याने गावकरी आपली तहान भागवत आहेत. ' धरण उशाला अन कोरड घशाला अशीच परिस्थिती कवठा वासीयांची झालीय.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT