Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! ट्रकची बसला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी

Washim Accident : वाशिमच्या पेडगाव येथे छत्रपती संभाजीनगर-नागपूर राष्ट्रयी महामार्गावर भीषण अपघात झाला. ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये झालेल्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

Yash Shirke

मनोज जैस्वाल, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वाशिमच्या पेडगाव या गावाजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सची धडक झाली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी सातच्या सुमारास घडल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या पेडगाव येथे भीषण अपघात झाला. आज (२३ जुलै) सकाळी सात वाजता हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. ट्रकचा टायर अचानक फुटला आणि त्यानंतर ट्रक समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसला जोरात जाऊन धडकला. या अपघातातील जखमींना वाशिम, शेलू बाजार आणि कांजारा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात ३ ते ४ जण गंभीररित्या जखमी झाले होते. तर १५ ते २० जणांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. नव्या माहितीनुसार, अपघाताग्रस्तांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

रायगडमध्ये एसटी बसचा अपघात

रायगडमध्ये एसटी बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. महाड विन्हेरे मार्गावर बसचा अपघात झाला. मांडवकर कोंड गावच्या हद्दीत चालकाचे एसटी बसवरचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस सरळ जाऊन झाडावर आदळली. या अपघातात बसमधील ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासह १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले.

महाड विन्हेरे मार्गावर अपघात झालेली ही एसटी बस पुण्याहून फौजी आंबावडे गावाकडे जात होती. त्याच दरम्यान ड्रायव्हरचे बसवरील नियत्रंण सुटले. भरधाव वेगाने जाणारी बस एका झाडावर जाऊन धडकली. या अपघातामध्ये ११-१२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra Politics: कालचे वैरी आजचे मित्र? शिंदेसेना आणि ठाकरेंसेना एकत्र येणार? VIDEO

Solapur Tourism: खरंच माथेरान, महाबळेश्वर विसराल! सोलापूरपासून 123 km दूर असलेल्या 'या' हिल स्टेशनवर एकदा जाच

Maharashtra Live News Update: पुणे जमीन व्यवहार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमधील आंबेडकरवादी पक्ष संघटना आक्रमक

Mix Dal Dosa Recipe: घरीच बनवा मिक्स डाळींचा पौष्टिक डोसा; नाश्त्यासाठी हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन

SCROLL FOR NEXT