Cricket Match Betting Saam tv
महाराष्ट्र

Cricket Match Betting: वर्ल्डकप क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी; पोलिसांची कारवाई, २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Washim News : वर्ल्डकप क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी; पोलिसांची कारवाई, २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल

वाशिम : भारतात सध्या वर्ल्डकप सुरु आहे. वर्ल्डकप (World Cup) पहिल्या टप्प्यात असून यात रोमहर्षक मॅच होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे सट्टेबाज सक्रीय झाले आहेत. अशाच मंगळवारी झालेल्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान रोमहर्षक मॅचवर सट्टाबाजार जोरात सुरु होता. अशा एका सट्टेबाजीवर (Police) पोलिसांनी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

वर्ल्डकप मध्ये मंगळवारी श्रीलंका व पाकिस्तान क्रिकेट मॅच झाली. या मॅचमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३४५ धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानचा संघ टार्गेट गाठेल कि नाही; याबाबत तर्क लावले जात होते. परंतु पाकिस्तानने हे लक्ष गाठत विजय प्राप्त केला. यामुळे या क्रिकेट मॅचवर जोरदार सट्टेबाजी (Betting) चालली. अशाच सट्टेबाजी करत असलेल्या दोन इसमांना वाशिमच्या रिसोड ते लोणी मार्गावर वाहनासह पकडण्यात आले. 

२८ लाखाचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी कारवाई करत सट्टेबाजांकडून एक गाडी, मोबाईल व टॅब असा एकूण २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर लाईव्ह सट्टेबाजी करत असलेल्या पाच जण ताब्यात घेत इतर दहा जणांवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हि कारवाई रिसोड पोलिसांनी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT