Washim Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Washim Water Shortage : ७९ विहिरींच्या निरीक्षणातून धक्कादायक वास्तव आले समोर; वाशीम जिल्ह्यावासीय चिंतेत

Washim News : ७९ विहिरींच्या निरीक्षणातून यंदा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे स्पष्ट झाले

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: यंदा वाशीम जिल्ह्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. यामुळे पाणी टंचाईची भीषणता जाणविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील जवळपास ७९ विहिरींचे सर्व्हे करण्यात आला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले असून यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. 

वाशीम जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले होते. परिणामी पाण्याचा साठा अधिक होऊ शकला नाही. याचे परिणाम आता उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. वाशिम जिल्ह्यात भूजल पातळी घटल्याने पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार सर्व सहा तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे समोर आले आहे. 

सहाही तालुक्यात पाणी पातळी घसरली 

वाशीम जिल्ह्यातील ७९ विहिरींच्या निरीक्षणातून धक्कादायक निष्कर्ष यंदा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, एप्रिल- मे महिन्यांत हा प्रश्न अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मनोर, कारंजा तालुक्यात अधिक गंभीर स्थिती 

जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये पाणी पातळी घसरल्याचे समोर आले आहे. विशेषतः मानोरा आणि कारंजा तालुक्यांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. शेकडो फूट बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्याने नागरिक चिंतेत आहेत. येत्या उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT