Washim News Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : हंडाभर पाण्यासाठी पायपीट; पाणी योजनेचा काम अपूर्ण, वाकदच्या महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Washim News : गावात सदर योजनेचे काम पूर्ण करण्याची तारीख २९ जून २०२४ पर्यंत होती. मात्र, काम पूर्ण करण्याची कालावधी लोटून सात महिने पूर्ण झाले आहेत. तरी देखील गावात पाण्याचा एक थेंबही पोहचला नाही

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजना राबविण्यात येत आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून योजनेचे काम सुरु असून अद्याप ते पूर्ण झालेले नाही. यामुळे आजही हंडाभर पाण्यासाठी महिलांना गावाच्या बाहेर पायपीट करत जावे लागत आहे. याच कारणामुळे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद येथील महिलानी हंडा घेऊन वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या दिला. 

वाशीम जिल्ह्यातील वाकद गावात जल जीवन मिशन हर घर जल या योजने अंतर्गत काम चालू असून मागील तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही गावात या योजनेचे पाणी पोहचले नाही. पाच कोटी रुपये खर्च होऊनही गावात योजने अंतर्गत पाण्याचा एक थेंबही पोहचला नाही. त्यामुळे गावातील ३०० महिला आणि पुरुषांनी संतप्त होत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धकड देत पाणी देण्याची मागणी केली आहे. 

२९ जूनपर्यंत होती मुदत 

गावात सदर योजनेचे काम पूर्ण करण्याची तारीख २९ जून २०२४ पर्यंत होती. मात्र, काम पूर्ण करण्याची कालावधी लोटून सात महिने पूर्ण झाले आहेत. तरी देखील गावात पाण्याचा एक थेंबही पोहचला नाही. परिणामी गावातील महिलांना हंडाभर पाणी घेण्यासाठी गावाच्या बाहेर दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करत जावे लागत असते. आजही हि परिस्थिती कायम असून उन्हाळ्यात याची भीषणता अधिक वाढण्याची शक्यता आहे. 

कंत्राटदारावर कारवाईची केली मागणी 

योजनेचे काम मुदत संपून देखील पूर्ण होत नसल्याने महिला व नागरिक संतप्त झाले. त्यामुळे आज महिला आणि गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी पाण्याच्या मागणीसाठी हंडा मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांना कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच गावात पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली. अन्यथा मोठ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT