Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News: समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सवर दगडफेक; ३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सवर दगडफेक; ३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल

वाशिम : विदर्भ ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरुन जात असतांना वाशिम (Washim) जिल्ह्यातील कारंजा टोलपासून काही अंतरावर रात्री अंदाजे बारा वाजेच्‍या दरम्यान ओव्हर ब्रिजवरून काही अज्ञातांनी लक्झरी बसवर (samruddhi Mahamarg) दगडफेक करत ट्रॅव्हल्सचे नुकसान झाले होते. ही घटना १७ जूनला घडली होती. यात एक जण जखमी झाला होता. दरम्यान याप्रकरणी आता वाशिम पोलिसांनी अकोला जिल्ह्यातून तीन जणांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. (Maharashtra News)

नागपुर ते पुणे विदर्भ ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरुन जात असतांना कारंजा टोलपासून काही अंतरावर रात्रीच्‍या सुमारास समृध्दी रोडवेवरून जाणाऱ्या ओव्हर ब्रिजवरून काही अज्ञात लोकांनी लक्झरी बसवर दगड फेकून मारले होते. यानंतर चालकाने २०० मीटर समोर नेवुन बस थांबविली. अज्ञात लोकांनी लक्झरी बसवर दगड मारल्यामुळे बसच्या काचा फुटल्या व बसमधील प्रवासी दयाराम हरी राठोड (रा.चिखली ता. दारव्हा जि. यवतमाळ) यास कानाजवळ दगड लागल्याने जखमी झाला. त्याच वेळी मागुन येणाऱ्या परपल लक्झरी बसवर देखील दगड मारुन काचा फोडल्या.

सीसीटीव्‍ही तपासून शोध

घटनास्थळावर पोलीस तसेच समृध्दी महामार्गचे पेट्रोलींग कर्मचारी रात्री २ वाजेपर्यंत पेट्रोलिंग करून शोध घेतला. परंतु दगड मारनारे लोकं दिसुन आले नाही. या गुन्‍ह्याच्या तपासात विषेश तपास पथक नेमून समृध्दी महामार्गाचे आजुबाजुच्या परीसरात गुप्त माहिती घेण्यात आली. बाजुच्‍या गावात अज्ञातांचा शोध घेण्यात आला. तसेच (Nagpur) नागपुर– औरंगाबाद हायवेवरील ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासुन संशयीत आरोपी शुभम दशरथ हांडे (वय २३, रा. पिंपळगाव हांडे), राम दिगांबर हांडे (वय २०), माधव गजानन वाळके (वय २३, दोन्ही रा.कीनखेड) यांना ताब्यात घेत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्‍याचे मान्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT