Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : समृद्धी महामार्गावर अडीच कोटी रुपयांची रॉबरी; धावत्या ट्रकमधून ४६ व्हॅक्सिन बॉक्स लंपास

Washim News : समृद्धी महामार्गावर आतापर्यंतची हि सर्वात मोठी रॉबरी मानली जात असून धावत्या ट्रकमधून बॉक्स लांबविण्याचे काम चोरटयांनी केले आहे. या प्रकरणी कारंजाच्या ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी रॉबरी झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या भिवंडी वरून नागपूर रायपूरमार्गे कोलकत्याकडे जाणाऱ्या ट्रकमधून व्हॅक्सिनचे ४६ बॉक्स चोरी गेले आहेत. या बॉक्सची किंमत तब्बल २ कोटी ४३ लाख ८६ हजार ६८४ रुपये आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाशिमच्या कारंजा जवळ समृद्धी महामार्गावर सदरची घटना घडली आहे. दरम्यान महेश कार्गो मूव्हर्स ट्रान्सपोर्टचा एक वातानुकूलित ट्रक भिवंडी येथून रुग्णालयाशी संदर्भातील व्हॅक्सिनचे बॉक्स घेऊन निघाला होता. भिवंडी वरून ट्रक निघाल्यानंतर बुलढाण्याच्या डोनगाव येथे एका पंपावर ट्रकमध्ये डिझेल भरले. डिझेल भरून ट्रक निघाल्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या कारंजा जवळ ट्रक येत असताना ट्रकच्या तापमानात वाढ झाल्याने ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला. 

चालत्या ट्रकमधून लांबवीले बॉक्स  

चालकाने साईड ग्लासमधून मागे पाहिले असता या ट्रकच्या मागील भागातून तीन लोकं उतरून पळाल्याचे लक्षात आले. यानंतर गाडी थांबून पहिले असता व्हॅक्सिनचे बॉक्स लांबविण्यात आल्याचे लक्षात आहे. यानंतर घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना ११२ वर कॉल करून सांगितली. त्यानंतर ट्रक हा कारंजा येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आला असून, ट्रकची तपासणी केली असता ट्रकमधील एकूण ४०८ व्हॅक्सिनचे बॉक्समधून ४६ बॉक्स लंपास करण्यात आले.

२ कोटी ४४ लाखाचा मुद्देमाल लांबविला 

ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेल्या ४०८ व्हॅक्सीन बॉक्सची किंमत ४ कोटी ५८ लाख रुपये असून, चोरी झालेल्या ४६ व्हॅक्सीनच्या बॉक्सची किंमत २ कोटी ४३ लाख ८६ हजार ६८४ रुपये आहे. या चोरीच्या तपासासाठी २५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पाच पथक मुंबई, मध्यप्रदेशमध्ये रवाना करण्यात आले आहेत. तांत्रिक बाबीने सुद्धा तपास सुरू केला आहे. अशी माहिती वाशिमचे पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT