Swabhimani Shetkari Sanghatna Saam tv
महाराष्ट्र

Crop Insurance : पीक विम्याच्या रक्कमेसाठी स्वाभिमानी संघटना आक्रमक; पीकविमा कंपनीने कार्यालयाला कुलूप लावून काढला पळ

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना या विरोधात आक्रमक झाली होती. (Crop Insurance) पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी संघटनेकडून ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. (Washim) मात्र आंदोलन होण्यापूर्वीच पीक विमा कंपनीने कार्यालयाला कुलूप लावून पाल काढल्याचा प्रकार वाशीम येथे घडला.  (Live Marathi News)

वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांना पिक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम मंजूर झाली आहे. मात्र जिल्ह्यातील २० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेले नाही. त्यामुळे (Swabhimani Shetkari Sanghatna) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी आक्रमक होऊन कार्यकर्त्यांसह पीकविमा कंपनीच्या कार्यालयात (Crop Insurance Company) ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र कंपनीने कार्यालयाला टाळा ठोकत पळ काढला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार्यालयासमोरून उठणार नसल्याचा पवित्रा  

विमा कंपनीने कार्यालयाला कुलूप ठोकून पाल काढला असला तरी जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे खात्यात टाकणार नाहीत, तोपर्यंत कंपनीच्या कार्यालयासमोरून उठणार नाही; असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT