Samruddhi Highway Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; ३ जण जागीच ठार

Car Truck Accident In Washim: वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कारने उभ्या ट्रकला दिलेल्या धडकेत तीनजण ठार झाले आहेत.

Rohini Gudaghe

मनोज जयस्वाल, साम टीव्ही वाशिम

वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आहे. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा इंटरचेंजजवळ हा अपघात झालेला आहे. भीषण अपघातात कार चालकासह तिनजण ठार झाल्याची माहिती मिळतेय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर एक ट्रक उभा होता. मागच्या बाजूने एक भरधाव कार आली अन् तिने या ट्रकला धडक दिली. त्यामुळे या भीषण अपघातात (Samruddhi Highway Accident) कार चालकासह तिघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त कारमधील मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

अपघातग्रस्त कारमधील तीन मृतकांपैकी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तो कारच्या मागील सीटवर होता. हा मृतदेह मालेगांव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर कारच्या पुढील सीटवर बसलेला चालक आणि एकाजणाचा मृतदेह कारमध्येच फसलेला असल्याची माहिती मिळतेय. आज सकाळी (३ जून) आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. तीनही मृतदेह पुरूषांचे (Car Truck Accident) आहेत. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील अपघात

छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावर कुंभेफळ चौकात बसने मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident News) झाला होता. या अपघातात एकजण ठार तर सोळाजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आलं (Road Accident) आहे. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT