Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Rain Update: धुव्वाधार पाऊस! सायंकाळीच आकाशात दाटला काळोख; सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट VIDEO

Maharashtra Weather Update Rain News: राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतेय. विविध शहरांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे.

Rohini Gudaghe

राज्यात रत्नागिरी, वाशिम, नागपूर अन् धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे बंधारे अन् पूल वाहून गेले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दुपारी पाच वाजताच आकाशात काळेकुट्ट् ढग जमून दाट अंधार पडल्याचं पाहायला मिळत आहे.

नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. काळोख दाटल्यानं वाहनांचे लावावे दिवे लागले आहेत. अचानक आलेल्या पावसाने विना छत्री घराबाहेर निघालेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाल्याचं दिसलं आहे.

रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी आलं. गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा थेट दुकानांमध्ये शिरला. तर खेड शहरातील गांधी चौकात पुरसदृश्य परिस्थिती दिसली (Maharashtra Weather Update) होती. नागपूरात देखील जोरदार पावसाला सुरवात आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला होता. हा मान्सूनचा पाऊस नसून तेथील वातावरणामुळे तयार झालेला पाऊस असल्याचं सांगितलं जात (Maharashtra Rain) आहे.

जोरदार सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस होत (Monsoon Update) आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील भामदेवी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं निर्माणाधीन बंधारा फुटून गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेल्यानं मोठं नुकसान झालंय. निर्मानाधिन बंधाऱ्याचं पाणी शेतात घुसल्याने शेताला नदीचं स्वरूप आलं (Weather Update) होतं. धाराशिव शहरासह तालुक्यातील सारोळा परीसरात जोरदार पाऊस झाला आहे. सारोळा शिवारातील नदी नाले, बंधारा तुडुंब भरला आहे. तर शेतात पाणीच पाणी साचल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT