Fire logo
Fire logo saam tv
महाराष्ट्र

Washim News: घरात सिलेंडरने अचानक पेट घेतला; अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला, वाचा नेमकं काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल, वाशिम

Washim News: वाशिमच्या कारंजा येथे एका घरात सिलेंडरने पेट घेतलेल्याची घटना समोर आली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत पेटलेल्या सिलेंडरला विझविण्यात यश आले. त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याच्या धाडसाचं परिसरातील लोकांकडून कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

वाशीमच्या कारंजा येथील शनिमंदिाजवळ सोळंके यांच्या घरातील सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे घरातील सदस्यमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सिलेंडरने पेट घेतल्याने घरात भीतीने आरडोओरड सुरू झाली. या घटनेमुळे घरातील सदस्यांची मदतीसाठी एकच धावाधाव सुरू झाली. घरातील सदस्यांनी तातडीने नगरपरिषद अग्निशामक दलाला फोनद्वारे माहिती दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारंजा नगरपरिषदेचे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. सिलेंडर पेट घेत असल्याने अग्निशामक दलाचा जवान शुभम झोपाटे यांनी जीवाची पर्वा न करता यांनी तात्काळ पेटता सिलेंडर विझविला. त्यावेळी त्यांच्या मदतीला चालक चंदू खराटे, अग्निशामक जवान अहमद खान व नरेंद्र भोयर यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

अग्निशामक दलाच्या जवानांच्या धाडसामुळे सुदैवाने जिवंत हानी टळली. उपस्थित नागरिकांनी सुद्धा जिगरबाज शुभम झोपाटे आणि कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल व सर्व कर्मचाऱ्यांचे आभान मानले.

फर्नीचरच्या गोदामाला आग, अग्निशामक दलाच्या जवानांचं आगीवर नियंत्रण

दरम्यान, सातारा शहरानजीकच्या रामनगर परिसरात सकाळच्या सुमारास काल एका फर्नीचरच्या गोदामास भीषण आग लागली. या आगीची माहिती कळताच सातारा पालिकेचे फायर ब्रिगेडचे पथक पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी पोहचले होते. या पथकाने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

रामनगर येथील अंबिका फर्निचर याच्या गोडाऊनला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती कळताच परिसरातील युवकांनी गोदामाच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पुढे आगीवर नियत्रंण मिळवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

SCROLL FOR NEXT