Washim Accident News Saamtv
महाराष्ट्र

Washim Accident News: अकोला- हैद्राबाद महामार्गावर विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Akola Hyderabad Highway Accident: दुचाकी चालकाचा अंदाज चुकल्याने कार, स्कूल बस आणि दुचाकीमध्ये हा विचित्र अपघात झाला.

Gangappa Pujari

मनोज जैस्वाल, प्रतिनिधी...

Washim Accident News: अकोला- हैद्राबाद महामार्गावर एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कार ,स्कूल बस व दुचाकीमध्ये हा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Akola Hyderabad Highway Accident)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, वाशिमपासून (Washim) दोन किलोमीटर अकोला - हैद्राबाद महामार्गावर अपघाताची घटना घडली. दुचाकी चालकाचा अंदाज चुकल्याने कार, स्कूल बस आणि दुचाकीमध्ये हा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.

तर कार आणि स्कूलबसचेही यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती त्यामुळे दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Latest Marathi News)

शिवशाही बसचा अपघात...

दरम्यान, परभणी शहरात शिवशाही बसचा अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना बसखाली आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे... 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT