Mahavitran News,  saam tv
महाराष्ट्र

Mahavitran च्या सहाय्यक अभियंता रक्तबंबाळ, NCP अजित पवार गटाच्या पदाधिका-यासह भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यातील महावितरण कर्मचा-यांनी घटनेचा निषेध नाेंदविला.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv Crime News : महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला बेदम मारहाण करुन त्याच्या डोक्यात खुर्ची घातल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली. या मारहाणीत सहाय्यक अभियंता रक्तबंबाळ झाला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यातुन संताप व्यक्त केला जात आहे. (Maharashtra News)

वाशी तालुक्यातील सारोळा, सोनेगाव, कवडेवाडी येथील शेतकरी तसेच गावकरी हे विजप्रश्नाबाबत तहसील कार्यालयासमोर बसले असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत सांडसे यांनी तेथे भेट दिली.

सांडसे यांनी सहाय्यक अभियंता हिंगमिरे यांना फोन केला. यावेळी फोनवर सकारात्मक चर्चा न झाल्याने त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन हिंगिरे यांना मारहाण केली आहे. डोक्यात खुर्ची लागल्याने सहाय्यक अभियंता हिंगमिरे हे रक्तबंबाळ झाले.

वाशी येथे महावितरणच्या (mahavitran) सहाय्यक अभियंत्यास मारहणार झाल्याची घटना धाराशिव जिल्ह्यात पसरली. या घटनेमुळे महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांतुन तीव्र संताप व्यक्त केला गेला. पाेलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे (ajit pawar faction) तालुकाध्यक्ष सांडसे आणि भाजपच्या नगरसेवकावर मारहाण केल्याची तक्रार आल्यानंतर तिघांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT