Maharashtra Weather : राज्यात 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा

राज्याच्या विविध भागांत पुढील ४ दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्याच्या विविध भागांत पुढील ४ दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. ओमानकडे गेलेल्या ‘शाहीन’ चक्रीवादळाची तीव्रता भारतात सध्या कमी प्रमाणात होत आहे.

हे देखील पहा-

बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच नैऋत्य बंगालचे उपसागर आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळ आणि तमिळनाडू किनारपट्टीपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी प्रमाणात दाबाचा पट्टा आहे. परिणामी येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यात मेघगर्जनेसह, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. पुणे शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. दुपारपर्यंत ऊन आणि सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र बघायला मिळले आहे. तसेच नागरिकांची तारांबळ देखील मोठ्या प्रमाणात उडाली होती. दरम्यान, पुढील ४ दिवस शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT