vitthal patil, pandharpur saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2023 : ...अन्यथा वारी थांबवू : वारकरी साहित्य परिषदेचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

सरकारने तातडीने मागणीवर विचार करावा असेही वारकरी साहित्य परिषदेने म्हटलं आहे.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपूरच्या आषाढी यात्रेला (pandharpur ashadhi wari) येणाऱ्या मानांच्या पालख्यांसह सर्व दिंड्यांना राज्य शासनाने 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केली आहे. पाटील हे आज (शुक्रवार) पंढरपूरात माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले पंढरपूरच्या यात्रेला येणारा भाविक गरीब, कष्टकरी वर्गातील आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काहीजण विठूभक्त इच्छा असताना देखील वारीला (pandharpur wari 2023) येऊ शकत नाहीत. अशा दिंड्यांना सरकारने अनुदान द्यावे. आमची मागणी तात्काळ मान्य न केल्यास सर्व दिंडीकरी - फडकरी सोबत घेऊन वारी थांबवण्याचा गंभीर इशारा देखील वारकरी साहित्य परिषदेने राज्य शासनाला दिला आहे.

दरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी सातारा जिल्ह्यातील लाेणंद येथे प्रशासनासमवेत बैठक घेत पंढरपूर यात्रा काळात भाविकांना पालखी सोहळ्याच्या कालावधीत कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना केल्या.

विखे पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली. प्रशासनाने सोहळ्याचे नियोजन जवळपास पूर्ण होत आलेले असे नमूद केले. यावेळी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

Sunday Horoscope : आनंदात, मौजमजा करण्यात जाणार या ३ राशींचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, लँडिंगवेळी विमानाचा भाग रनवेला धडकला

Maharashtra Live News Update: वीज पडून 23 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू,वर्ध्यातील घटना

Yavatmal Rain: पैनगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, यवतमाळ- नांदेडदरम्याची वाहतूक ठप्प, दोन जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT