Raksha Bandhan Saam tv
महाराष्ट्र

Raksha Bandhan : गाडे वारकरी कुटुंबीयांनी चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण केली सोन्याची राखी

Pimpri chinchwad News : गाडे वारकरी कुटुंबीयांनी चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण केली सोन्याची राखी

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : रक्षाबंधनानिमित्त आज आळंदी येथे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींना (Raksha Bandhan) वाघोली येथील गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी (Alandi) सोन्याची राखी अर्पण केली आहे. (Maharashtra News)

बहिण भावांचा अतूट प्रेम आणि नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन. याचं सणाच्या निमित्ताने वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे. वारकरी मंडळी हे ज्ञानेश्वर माऊलींना आपला देव, माय, बाप, बहीण, भाऊ अस सर्व काही समजतात. अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी सोन्याच्या राखी ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. 

तसेच यंदा पडलेल्या दुष्काळातून राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा आर्थिक दिलासा मिळू दे आणि शेतकऱ्यांची सुख, शांती आणि समृध्दीने भरभरून प्रगती होऊ दे; अशी मागणी देखील गाडे कुटुंबीयांनी कैवल्यसम्राज चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलीकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT