Wardha : वर्ध्यात वीज अंगावर कोसळून बापलेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू saam tv
महाराष्ट्र

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Wardha lightning strike: धावत्या दुचाकीवर वीज कोसळली. वर्धा येथील सोनेगाव अल्लीपूर रस्त्यावर धोत्रा चौरस्त्यावर ही घटना घडली. यात बापलेकाचा मृत्यू झाला. तर पुतण्या गंभीर जखमी झाला आहे.

Nandkumar Joshi

  • वर्धा येथे दुर्दैवी घटना

  • धावत्या दुचाकीवर वीज कोसळली

  • बापलेकाचा करूण अंत

  • पुतण्याची मृत्यूशी झुंज

चेतन व्यास, वर्धा | साम टीव्ही

धावत्या दुचाकीवर वीज कोसळून बापलेकाचा करूण अंत झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या पुतण्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. वर्धा येथील सोनेगाव अल्लीपूर रस्त्यावर धोत्रा चौरस्ता येथे ही घटना घडली. हे तिघेही दुचाकीवरून आपल्या घरी परतत होते. ही घटना आज, शुक्रवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.

वर्ध्याच्या सोनेगाव-अल्लीपूर रस्त्यावर धोत्रा चौरस्ता येथे ही दुर्दैवी घटना घडली. वडील, मुलगा आणि पुतण्या हे तिघे दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते. त्याचवेळी या तिघांच्या अंगावर वीज कोसळली. धावत्या दुचाकीवर वीज कोसळून त्यात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. तर पुतण्या गंभीर जखमी आहे. हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात तो मृत्युंशी झुंज देत असल्याची माहिती आहे.

भिवापूर येथील अनिल ठाकरे हे आपला सतरा वर्षीय मुलगा वेदांत ठाकरे व पुतण्या सौरभ ठाकरे याच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गाने आपल्या दुचाकीवरून भिवापूर गावाकडे निघाले होते. धोत्रा चौरस्ता येथे अचानक दुचाकीवर वीज कोसळली. यात वडील अनिल ठाकरे आणि मुलगा वेदांत ठाकरे हे जागीच ठार झाले. पुतण्या सौरभ ठाकरे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून मृत्यूशी झुंज देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: पती ठरला प्रेमात अडसर; प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला गेम नंतर रचला अपघाताचा बनाव

Last Sunset 2025: सरत्या वर्षाचा सूर्यास्त; 2025 ला निरोप देतानाचे सुंदर फोटो पाहा

शिंदे गटाला हादरा, बालेकिल्ल्यात मोठी बंडखोरी, राजकीय समीकरण बदलली

Maharashtra Live News Update: माजी उप महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद

Kumbha Rashi 2026: प्रेम की विरह, नवं वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार? वाहन खरेदी, प्रॉपर्टीत वाढ होणार का?

SCROLL FOR NEXT