Wardha News सुरेंद्र रामटेके
महाराष्ट्र

वर्ध्यात तरुणाईची झिंगाट दारु पार्टी; आयोजकासह फार्म मालकास अटक

सोशल मीडियावर तीन दिवसांपासून सुरु होती जाहिरात

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा - दारूबंदी जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. मात्र, जिल्ह्यात दारू पार्टीचे आयोजन ही बाब काही पटणारी नव्हती. मग काय पोलिसांनी (Police) वेळीच पालोती गावासमोर असलेले फार्म हाऊस गाठून सुरु असलेल्या ‘डिजे पार्टी’चा डाव उधळून लावत पार्टीचे आयोजन करणाऱ्यासह फार्म मालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी अटक केलेल्यात जिल्हा परिषद सदस्य उमेश गोपाळ जिंदे आणि सौरभ दिलीपसिंह ठाकूर यांचा समावेश आहे. डीजेच्या तालावर झिंगाट असलेले तरुण तरुणी पोलीस पाहताच तेथून फरार झाले. एवढच नव्हे तर या पार्टीची जाहिरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून युवकांच्या सोशल मीडिया (Social Media) ग्रुप वर फिरवल्या जात होत्या.

हे देखील पहा -

पालोती गावाच्या काही दूर अंतरावर उमेश जिंदे याच्या मालकीचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सौरभ ठाकूर याने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी आयोजकांनी सोशल मीडियावर देखील मोठा गाजावाजा केला होता. या पार्टीत मोठ्या संख्येत तरुणाईने हजेरी लावली होती. मात्र, याची चुणूक सावंगी पोलिसांना लागताच रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सावंगी पोलिसांनी पालोती स्थित एक फार्म हाऊस गाठून पोलिसांनी या पार्टीचा डाव उधळून लावत दोघांना बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी डिजे पार्टीवर छापा मारुन महागड्या कंपनीचा दारुसाठा आणि बिअर असा एकूण ४४ हजार ५०५ रुपयांचा विदेशी दारुसाठा जप्त केला. तसेच ज्या कारमधून दारु आणली गेली ती कार, सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर असा एकूण ३ लाख ५२ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : Pune: २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आईच्या प्रियकराचं भयंकर कृत्य; मालिश करायला सांगायचा अन्...

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन, प्रसूतीदरम्यान घेतला अखेरचा श्वास

Election: मोठी बातमी! BMC निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Navi Mumbai Tunnel: नवी मुंबईचा कायापालट होणार, पाम बीचखालून जाणार भुयारी मार्ग; नेमका प्लान काय?

SCROLL FOR NEXT