Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : पाय घसरून पडल्याने कार नदीच्या पुरात युवक गेला वाहून; कारंजा तालुक्यातील घटना, शोधकार्य सुरु

Wardha News : मद्यप्राशन करून तेथे एका दुकानात चिवडा खायला बसले व अजय याला धरणामध्ये मासोळ्या पकडायला गेला असता त्याचा पाय घसरुन पडला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील कार नदीच्या पुराच्या पाण्यात युवक वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून वाहून गेलेल्या युवकाचं शोधकार्य सुरू आहे. मात्र युवकाचा तपास लागला नसल्याने आज सकाळपासून पुन्हा शोधकार्याला सुरवात करण्यात आली आहे. 

वर्धा (Wardha) जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. यामुळे कारंजा तालुक्यातील कार प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यात नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील खराळा या गावातील एक युवक वाहून गेला असून अजय सलामे (वय २२) असे वाहून गेलेल्या युवकाच नाव आहे. अजय सलामे हा आपल्या मित्रासोबत रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कार नदी प्रकल्प बघण्याकरीता आले होते. त्यांनी मद्यप्राशन करून तेथे एका दुकानात चिवडा खायला बसले व अजय याला धरणामध्ये मासोळ्या पकडायला गेला असता त्याचा पाय घसरुन पडला पाणी खोलवर असल्याने तो पाण्याचा प्रवाहात वाहून दिसेनासा झाला.

दरम्यान त्याच्या सोबत असलेल्या मित्रानी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी त्वरीत घटनेची माहिती (Police) पोलिसांना दिली. या घटनेची माहिती समजताच कारंजा पोलिस स्टेशनचे पोलीस अधीकारी व सहकारी पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने नदी पात्रात शोध घेतला. मात्र तरुण अद्याप सापडला नाहीय. अद्यापही शोध मोहीम सुरुच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सांगलीत भयंकर अपघात, भरधाव कारने ४ पोलिसांसह १५ जणांना उडवले, पाहा व्हिडिओ

T20 WC: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासोबत खेळा नाहीतर...! ICC ने पाकिस्तानला दिली शेवटची वॉर्निंग

Shoes Cleaning Tips : घरच्या घरी मळलेले शूज करा साफ, पुन्हा देतील नव्यासारखी चमक, जाणून घ्या टिप्स

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

SCROLL FOR NEXT