Wardha Rain Saam tv
महाराष्ट्र

Wardha Rain : पुराच्या पाण्यात शाळकरी मुलासह तिघेजण अडकले; मुसळधार पावसाने यशोदा नदीला पूर, बचाव पथक दाखल VIDEO

Wardha News : वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासुन पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान देवळी तालुक्यात जोरदार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. काही भागात मुसळधार पाऊस होत असून काही ठिकाणी रिपरिप सुरु आहे. दरम्यान वर्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे तिघेजण यशोदा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले आहेत. यामध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे. या तिन्ही मुलांना पुराच्या पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी बचाव पथक दाखल झाले आहे.

राज्यातील अनेक भागात मागील दोन- तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही भागात तर पावसाची संततधार सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासुन पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान देवळी तालुक्यात जोरदार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात अडकलेल्यामध्ये एक शाळकरी मुलगा तर इतर दोघांचा समावेश आहे. 

बचाव पथकाने तिघांना काढले बाहेर 
यशोदा नदीला पूर आल्याने मुले अडकले आहेत. तिन्ही मुले डिगडोह येथील स्मशानभूमीच्या शेडमध्ये थांबले असून शेडच्या आजूबाजूला पुराच्या पाण्याचा विळखा आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर दाखल झाले असून मुलांना पुरातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बचाव पथकाचे कर्मचारी व देवळी येथील अग्नीशामक दलाचे कर्मचारी उपस्थित झाले. पुरात अडकलेल्या भावेश अमोल कापसे (वय १५, रा डीगडोह), उमेश रामदास साखरकर (वय ३८, रा. नागझरी), प्रज्वल पंडित सावरखेडे (वय ४०, रा नागझरी) या तिघांना वाचविण्यात आले आहे. तर एक दुचाकी आणि एक सायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. 

भंडारदरा धरण निम्मे भरले
अहिल्यानगर
: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले ११ टिएमसी क्षमतेचे भंडारदरा धरण परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे ५२ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग वाढल्याने धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहीला, तर ऑगस्ट महिन्यात भरणारे भंडारदरा आणि निळवंडे धरण जुलै महिन्यातच भरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT