Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : रुग्ण पाठविण्याचे सांगत महिला डॉक्टरची फसवणूक; खात्यातून परस्पर काढली रक्कम

Wardha News : फसवणुकीचे प्रकार मागील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फसवणूकीच्या प्रकारात शिक्षित देखील अडकत आहेत. या दरम्यान वर्धा शहरात एका डॉक्टराची फसवणूक झाली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: लष्करातील रुग्ण रुग्णालयात पाठवायचे आहे, असे सांगून अनोळखी व्यक्तीने महिला डॉक्टरच्या खात्यावरून १ लाख १८ हजारांची रोख परस्पर वळती केली. ही घटना शहरातील लक्ष्मीनगर बेद लेआउट परिसरात घडली. या प्रकरणी डॉ. कल्पना बडोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.

फसवणुकीचे प्रकार मागील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वेगवेगळे आमिष देत फसवणूक करण्यात येत असते. या फसवणूकीच्या प्रकारात शिक्षित देखील अडकत आहेत. या दरम्यान वर्धा शहरात एका डॉक्टराची फसवणूक झाली आहे. यात समोरच्या व्यक्तीने आर्मी कॅम्प रुग्ण पाठविण्याचे सांगत फसवणूक करत बँक खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

विश्वासाने दिला पिन 

दरम्यान डॉक्टर महिला या घरी असताना त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. समोरच्याने वर्धा येथे आर्मी कॅम्प लागल्याची बतावणी करून तेथील रुग्ण रुग्णालयात पाठवायचे आहे, असे सांगितले. यासाठी त्याच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर श्रीकांत शर्मा नावाने लेटर पाठविले. डीपीवर लष्करातील गणवेशात असलेला फोटो पाहिल्याने मागितलेल्या माहितीप्रमाणे गुगल पेचा पिन समोरच्याला विश्वासाने दिला. 

खात्यातून परस्पर काढली रक्कम 

महिला डॉक्टराने पिन क्रमांक देताच त्याच्या खात्यावरून १ लाख १८ हजार १६९ रुपये परस्पर काढून घेण्यात आले. खात्यातील रक्कम कपात झाल्याचा संदेश प्राप्त झाल्याने डॉक्टराना घडला प्रकार लक्षात आला. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रील स्टारकडे आढळला हत्यारांचा साठा

Numerology: सावधान! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी घातक आहे एप्रिलचा महिना

Ashok Kharat Case: मोठी बातमी! अशोक खरातचे सगळे कारनामे समोर येणार? SIT ने पुन्हा घेतला ताबा

Belly Fat: जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक

Poonam Pandey: आधी मरणाचं नाटक आणि आता म्हणते, 'मी प्रेग्नेंट नाही...'; पूनम पांडेने पुन्हा केली चाहत्यांची मस्करी

SCROLL FOR NEXT