Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: मोबाईल व्यावसायिकास धक्काबुक्की; अडीच लाखांच्या रोखीसह दुचाकी पळविली

मोबाईल व्यावसायिकास धक्काबुक्की; अडीच लाखांच्या रोखीसह दुचाकी पळविली

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : मोबाईल विक्री करणाऱ्या व्यावसायिकास धक्काबुक्की करुन अज्ञात चोरट्याने बळजबरीने दुचाकीसह डिक्कीत ठेवून असलेली (Wardha News) अडीच लाख रुपयांची रक्कम घेऊन धूम ठोकली. ही घटना गोपूरी परिसरात असलेल्या गिताई नगर येथे रात्री घडली. शहर पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली. (Breaking Marathi News)

तुलसिदास परमानंद अडवानी (६६) यांचे सोशालिस्ट चौकात (Crime News) मोबाईलचे दुकान आहे. रात्री ९ वाजताच्या सुमारास तुलसिदास यांनी दिवसभर मोबाईल विक्रीतून आलेली २ लाख ५० हजार रुपयांची रोकड निळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून ती बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. तुलसिदास हे दुचाकीने धुनिवाले मठ चौकातून गिताईनगरडे घरी जाण्यासाठी निघाले.

दुचाकीवरून पाडले खाली

दरम्यान गिताईनगरच्या बोर्डजवळ मोबाईल फोन वाजल्याचा भास झाल्याने त्यांनी दुचाकी थांबवून मोबाईल तपासात असतानाच अज्ञात चोरटा त्यांच्याजवळ आला आणि तुलसिदास यांना धक्का मारुन दुचाकीवरुन खाली पाडले. चोरट्याने जबरदस्ती दुचाकी पळविण्याचा प्रयत्न केला. दुचाकीच्या डिक्कीत पैसे असल्याने तुलसिदास यांनी त्याचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. पण, चोरट्याने तुलसिदास यांना मारहाण करुन डिक्कीतील अडीच लाख रुपयांसह दुचाकीने धूम ठोकली.

पोलिसात गुन्‍हा दाखल

पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनीही घटनास्थळाला भेट देत पाहणी करुन आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT