Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: तृतीयपंथी शिवानी वर्धा जिल्‍हा ‘आयकॉन’; मतदार नोंदणीसाठी करणार प्रोत्‍साहित

तृतीयपंथी शिवानी वर्धा जिल्‍हा ‘आयकॉन’; मतदार नोंदणीसाठी करणार प्रोत्‍साहित

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. तसेच २०२४ मधील विधानसभा, लोकसभा निवडणुका (Election News) लक्षात घेत जास्तीत जास्त तरुणांनी मतदार नोंदणी करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली ॲड. शिवानी सुरकार हिची (wardha) वर्धा जिल्हा ‘आयकॉन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केली आहे. (Maharashtra News)

आगामी निवडणूका लक्षात जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत ३२ हजार नवीन मतदार नोंदणी करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर ते ५ डिसेंबरपर्यंत ६ हजार ५०० नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. मतदार नोंदणीत अधिकाअधीक तरुणांनी नोंदणी करण्यासाठी तरुणांना प्रेरीत करणाऱ्या व्यक्तीमत्वाची आवश्यकता होती. त्यानुसार विदर्भाची पहिली तृतीयपंथी वकील बनून स्वकर्तुत्वाने संपूर्ण विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऍड. शिवानी सुरकार हिची ‘आयकॉन’ म्हणून निवड करण्यात आली.

समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथी. त्यांना विविध गोष्टीचा सामना करावा लागतो, त्यांना समाजात हिनवले जाते. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागते. पण याला अपवाद ठरली ती म्हणजे वर्धाच्या रामनगर इथली शिवानी सुरकार. विदर्भात पहिली तृतीयपंथी वकील तर शिवानी बनली आता तर मतदार नोंदणीसाठी तीची जिल्हा आयकॉन म्हणून निवड करण्यात आलीय.

चार पदव्‍या मिळविणारी शिवानी

शिवानी उर्फ विजय हिचा जन्म हा विजया दशमीला झाल्याने तिचे नाव विजय असे घरच्यांनी ठेवले. परंतु, ती तृतीयपंथी आहे असे कळल्यानंतर तिला सर्वात जास्त धीर आणि आधार वडील संतोषराव सुरकार यांनी दिल्‍याचे शिवानीने सांगितले. वडिलांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुला समाजात जगायचे असेल तर तुला खूप शिकावे लागेल. त्यांचे ऐकून शिवाणीने स्वतःला शिक्षणाच्या प्रवाहात झोकून घेतले व वर्धेतूनच तिने बी. कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. नंतर सेवाग्राम इथून एमबीए केले. दिल्ली विद्यापीठाचा एनडीडी हा नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रमही तिने पूर्ण केला आहे. त्यानंतर तिने यशवंत महाविद्यालयातून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं केले. ती देशात तिसरी, राज्यात दुसरी तर विदर्भात पहिली तृतीयपंथी वकील आहे. तीन ते चार पदव्या असलेली तृतीय पंथातील आपण पहिलेच असल्याचा दावाही शिवाणीने बोलतांना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT