Crop Insurance Saam tv
महाराष्ट्र

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Wardha News : खरीप हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यात ४ लाख ७ हजार २६६ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले होते. सध्या स्थितीत पेरणी आटोपल्या आहेत. गत दोन दिवसाअगोदर झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी नवीन पीक विमा योजना सुरु केली आहे. मात्र शेतकऱ्यांचा यंदा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. विशेष म्हणजे योजनेत लाभ घेण्यासाठी सरकारकडून मुदत वाढविण्यात आल्यानंतर देखील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे. गतवर्षीच्या तब्बल दोन लाख शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा योजनेत सहभाग घेतला नसल्याचे चित्र आहे. 

राज्य शासनाने मागील वर्षी एक रुपयात पीकविमा योजना राबविली होती. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांना विमा कवच मिळाले होते. परंतु, नुकसानीनंतर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. शासनाने या वर्षी १ रुपयात पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांच्या खिशावर भार पाडला असून अटीही किचकट असल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

१४ ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती मुदत 

नवीन पीकविमा योजना जाहीर केली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांना विमा कवच मिळणार होते. अर्थात नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना पिक विम्याच्या रक्कमेच्या स्वरूपात मिळत असते. यासाठी पहिल्या टप्प्यात ३१ जुलैपर्यंत विशिष्ट रक्कम भरून पिकांचा विमा काढण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळला होता. त्याअनुषंगाने शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहू नये; यासाठी शासनाने १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. 

२ लाख शेतकऱ्यांनी फिरविली पाठ 
सन २०२४ मध्ये एक रुपयात पीकविमा उपलब्ध केला होता. त्यानुसार जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ८०५ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र या वर्षी केवळ ५९ हजार ३४७शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी २ लाख ३ हजार ४५८ शेतकऱ्यांनी विमा काढला नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात मुसळधार पाऊस

Maharashtra Government: सरकार शेतकऱ्यांना देणार गुड न्यूज: मुख्यमंत्री लवकरच पूर्ण करणार राज्यातील बळीराजाची मोठी मागणी

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT