Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: वाळूमाफियांचा डाव लावला उधळून; खनिकर्म अधिकारी थेट दुचाकीने पोहचले वाळूघाटावर

वाळूमाफियांचा डाव लावला उधळून; खनिकर्म अधिकारी थेट दुचाकीने पोहचले वाळूघाटावर

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील गुंजखेडा या वाळूघाटावर जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी दुचाकीने (Wardha News) जात वाळूघाटावर धाड टाकली. खनिकर्म अधिकारी अचानक पोहचल्याने तराफ्याच्या सहाय्याने वाळू काढत असलेल्या मजुरांनी तेथून पळ काढला. कारवाईत वाळू काढण्यासाठी बनविण्यात आलेले तराफे जप्त करण्यात आले आहे. (Letest Marathi News)

गुंजखेडा वाळूघाटावर (Valu Mafia) मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याची चर्चा सगळीकडे एकावयास मिळत होती. वाळू काढण्यासाठी ड्रमच्या सहाय्याने तराफे तयार करून मजुराच्या सहाय्याने येथून वाळू उपसा सुरु होता. मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करत टॅक्टरच्या सहाय्याने विकल्या जातं होती. अनेकदा कारवाई करूनही वाळूमाफियांचा हा गोरखधंदा सुरूच असल्याने जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी थेट दुचाकीने येत या ठिकाणी कारवाई केली.

चार तराफे केले जप्‍त

खनिकर्म अधिकारी पोहचताच चार तराफ्याद्वारे आठ मजूराच्या साहाय्याने पाण्याखालील वाळू काढत होते. खनिकर्म अधिकाऱ्यांचा पथक दिसताच मजुरांनी तेथून पळ काढला. या कारवाईत घाटावरील काही साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. तर इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी केली असून त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यालयातील तुषार शिंदे या कर्मचाऱ्याचा सहभाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टँकरमधून ऑइल गळती, सटासट २२ दुचाकी घसरल्या, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Bhaubeej Gift: भाऊबीजच्या दिवशी बहिणीला कोणत्या वस्तू भेट देणे टाळावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT