Wardha Crime News SAAM TV
महाराष्ट्र

Wardha Crime : वर्ध्यात कथित भाईंची 'फावडा गँग'; आधी युट्यूबवर व्हिडिओ बघितले नंतर एरियात धुमाकूळ घातला

Wardha Crime : कथित ‘भाईं’नी युट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडल्या.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha Crime News : ‘भाईगिरी’चं वर्चस्व दाखवण्यासाठी डोक्यात हवा गेलेली काही तरूण मंडळी शक्कल लढवून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम करत असतात. असाच प्रकार हिंदनगर परिसरात घडला. तीन कथित ‘भाईं’नी आधी युट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर मद्यधुंद अवस्थेत फावड्याचा दांडा हाती घेऊन परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या चारचाकींच्या काचा फोडल्या.

केवळ दहशत निर्माण करणे हाच यामागचा त्यांचा उद्देश होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

युट्यूबवर ‘भाईगिरी’ला प्रोत्साहन देणारे विविध व्हिडीओ पाहून तरूण मंडळी त्यांनाच आपला आदर्श मानायला लागतात आणि त्यांच्याच सारखी दहशत आपणही निर्माण करू या अविर्भावात नशेत दहशत माजवण्याचे काम करतात. (Crime News)

हिंदनगर परिसरात २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास १० ते १५ चारचाकींच्या काचा तीन कथित ‘भाईं’नी फोडल्या. याचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता, तिघेही हिंदनगर परिसरातीलच रहिवासी असल्याचे समजते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला असता, तिघांपैकी एक जण हाती सापडला. त्याने पोलिसांना त्या रात्री आम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहिले. त्यात काही जण चारचाकींच्या काचा फोडून दहशत पसरवत असल्याने आम्ही देखील त्यांचेच अनुकरण केले आणि चारचाकींच्या काचा फोडल्याचे सांगितले.

सोबत असलेल्या एका आरोपीने हे करण्यास भाग पाडल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे तीन जणांपैकी दोघे जण अल्पवयीन आहेत, तर एका आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu : पाय लटपटले, पदर ओढला; समांथा रुथ प्रभू चाहत्यांच्या गर्दीत अडकली, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update: भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार

Ravindra Chavan : KDMC साठी भाजपचा स्वबळाचा नारा? १२२ जागांसाठी हजारो कार्यकर्त्यांची तयारी

PM Narendra Modi : महायुतीच्या विजयानंतर PM मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा, म्हणाले - 'महाराष्ट्र विकासाच्या...'

PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT