Wardha Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Wardha Heavy Rain : वर्ध्यात मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

Wardha News : वर्धा जिल्ह्यासाठी १९ व २० जुलैला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून जोरदार पाऊस सुरु आहे. शिवाय जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान विभागाने दिला होता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे.

वर्धा (Wardha) जिल्ह्यासाठी १९ व २० जुलैला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. आकाशात ढगाळ वातावरण असून सूर्याचे दर्शन देखील झालेले नाही. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु असून आणखी जोरदार पाऊस झाल्यास वर्धा, वणा, बोर, पोथरा, यशोदा, धाम नदीसह लाल नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय (Heavy Rain) मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन 
जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर केल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यास नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच अतिवृष्टीच्या इशारा कालावधीत पर्यटन स्थळावर गर्दी न करण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. तर कोणतीही घटना घडल्यास तात्काळ जिल्हा किंवा तालुका नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनप्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT