Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क येताय मासांचे तुकडे

Wardha News : गावात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असतो. मात्र, दोन वर्षांपासून टाकीतून दूषित पाणी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच गंभीर बनला आहे. बऱ्याचदा पिण्याच्या पाण्याच्या नळातून शेवाळ किंवा दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र वर्ध्यामध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. तर पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मासांचे तुकडे येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मागील दोन वर्षांपासून दूषीत पाणी येत असल्याने गावकरी देखील त्रस्त झाले आहे. 

वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव बैलमारे गावात पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मासांचे तुकडे येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असतो. मात्र, दोन वर्षांपासून टाकीतून दूषित पाणी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इतकेच नव्हे तर नळातून विविध प्राण्यांच्या मासांचे तुकडे येत असल्याचेही पुढे आले आहे.

गावकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष 

दरम्यान गावकऱ्यांनी ग्रामपंचायत, तहसीलदार, बीडीओ यांच्याकडे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, कुणीही या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नाही. ग्रामपंचायतीकडून पाण्याच्या टाकीची योग्य देखभाल केली जात नाही, साफसफाई होत नाही. तहसीलकडे वारंवार तक्रारी करुनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या निधीचा योग्य वापर ग्रामपंचायत कडून करण्यात येत नसल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

मासांचे तुकडे मिश्रित पाणी घेऊन जिल्हा परिषदेत धडक 
तर गावकऱ्यांना होत असलेल्या दूषीत पाण्यामुळे गावकऱ्यांमध्ये गॅस्ट्रो, हगवण, उलटी, मळमळ आदी जीवघेणे आजार जडले आहेत. यामुळे गावातील लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांच्या जीवाला धोका असून शासनाने तात्काळ उपयोजना करत शुद्ध पाणी देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी; या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेत मासांचे तुकडे असलेले पाणी घेऊन धडक देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Wearing Rules: 'या' ३ राशींसाठी चांदी आहे घातक; नशिबी येते दारिद्रय, 'राजाचा होतो रंक'

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर थेट घरात आणि हॉटेलमध्ये घुसली कार

Frequent urination: दिवसातून किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल आहे?

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT