Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: मोबाइल टॉवरवर चढला मद्यपी, पोलीस आल्यानंतर खाड्कन नशा उतरली; वर्ध्यात नेमकं काय घडलं?

Wardha News: वर्ध्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विरूळ गावात ही घटना घडली आहे.

Vishal Gangurde

चेतन व्यास

Wardha Latest News:

मद्यपी मद्यधुंद अवस्थेत काय करेल, याचा नेम राहत नाही, अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. वर्ध्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विरूळ गावात ही घटना घडली आहे. एका मद्यपीने चक्क मोबाईल टॉवरच्या टोकावर जाऊन विरुगिरी केल्याचा प्रकार केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकही भयभीत झाले होते. अखेर पोलिसांना पाचारण करताच त्यांच्या भीतीपायी मद्यपी टॉवरखाली उतरला अन् नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. हा थरार जवळपास अर्धातास सुरु होता. (Latest Marathi News)

गावातील सर्व नागरिक आपल्या कामात व्यग्र असतानाच एक मद्यपी मोबाइल टॉवरवर चढल्याचे दिसून आले. तो टॉवरच्या शेवटच्या टोकावर बसून होता. तसेच जोरजोरात आरडाओरड करुन हात सोडण्याचा प्रयत्न करीत होता. नागरिकांना ही बाब माहिती होताच नागरिक टॉवरखाली जमा झाले. मोबाइल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी गावातील पोलीस पाटील यांना याची माहिती दिली.

कर्मचाऱ्यांनी मद्यपीला टॉवरखाली उतरण्याची अनेकदा विनंती केली. मात्र, मद्यपी कुणाचेही ऐकत नसल्याचे पाहून पुलगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस येणार असल्याचे मद्यपीला समजताच त्यांच्या भीतीने मद्यपी पोलीस येण्यापूर्वीच टॉवरखाली उतरला. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिसांनी त्याला समज देत घरी पाठविले. या घटनेने मात्र, नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले हे तितकेच खरे आहे.

कल्याण रेल्वे स्टेशनवर मद्यपीकडून महिला प्रवाशांशी अश्लील चाळे

कल्याण रेल्वे स्टेशनवरील ब्रिजवर नशेत धुंद असलेला मद्यपी महिला प्रवाशांशी अश्लील चाळे करत छेड काढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानकावरील काही प्रवाशांनी त्याचे हे कृत्य बघितल्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर प्रवाशांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी रेल्वे पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे कल्याण रेल्वे स्टेशनवरील नशेखोरांचा वावर पुन्हा एकदा वाढल्याचं दिसून येतेय.

दरम्यान, गेल्या महिनाभरापूर्वी कल्याण रेल्वे स्टेशन आणि परिसरात नशेखोरांकडून महिला प्रवाशांची छेड काढल्याच्या घटना घडल्या होत्या . कल्याण रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात वावरणाऱ्या नशेखोरांवर कारवाई करण्याचा धडाका लावला. मात्र कारवाई मंदावल्याने पुन्हा एकदा नशेखोरांचा त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

Crime News : कोयत्याने वार करत पतीने घेतला पत्नीचा जीव, त्यानंतर मृतदेहाजवळ बसला, परिसरात खळबळ

Crime News: डिलिव्हरीनंतर वजन वाढलं, कमी करण्यास महिला अपयशी; नाराज नवऱ्याने बायकोचा जीव घेतला

कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटच्या क्षणी गेम चेंज; 'Bigg Boss 19'च्या घरात आठवडाभर चालणार 'या' सदस्याची सत्ता, नवा कॅप्टन कोण?

Dombivli Investment Scam : आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं, गुंतवणूकदारांना लुबाडलं, कोट्यवधी रुपयांची फसवणूक

SCROLL FOR NEXT