Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : शिक्षकांची फ्री स्टाईल, नंतर विद्यार्थ्यांना बदडले; बोपापूर जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Wardha : शाळेतील शिक्षकांत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून शाब्दिक खडाजंगी होत असते. तर अनेकदा तर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचत असते. पण प्रकरण पोलिस कचेरीपर्यंत पोहाचलेले नसल्याचे सांगण्यात आले

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील बोपापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांमध्ये चांगलीच फ्री स्टाईल झाली. शिक्षकांमधील मारहाणीचा प्रकार झाल्यानंतर मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना क्षुल्लक कारण पुढे करून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या घटनेतील पीडित मुलांना मारहाण केल्याबाबतचे कथन होणारा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने शिक्षण विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

वर्ध्याच्या हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोपापूर येथील उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. या जिल्हा परिषद शाळेत एक ते सात पर्यंतचे वर्ग आहेत. शिवाय तेथे चार शिक्षण नियुक्त आहेत. या शाळेतील शिक्षकांत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून शाब्दिक खडाजंगी होत असते. तर अनेकदा तर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचत असते. पण प्रकरण पोलिस कचेरीपर्यंत पोहाचलेले नसल्याचे सांगण्यात आले. 

फ्री स्टाईलनंतर विद्यार्थ्यांना मारहाण  

अशातच २९ जानेवारीला या शाळेतील दोन शिक्षकांत चांगलीच फ्री स्टाईल झाली. तर नंतर याच शिक्षकांनी शाळेतील काही विद्यार्थ्यांना पांढरी टोपी का घातली नाही? असे म्हणत बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर पीडित विद्यार्थ्यांनी घडल्या प्रकाराबाबत घरच्यांना माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांच्या निकटवर्तीयांनी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत आणि पीडित विद्यार्थी त्यांना मारहाण केल्याची कबुली देणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

चौकशी करून दोषींवर कारवाई करणार 

या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी नीतू गावंडे यांना विचारणा केली असता २९ जानेवारीला संबंधित शाळेतील शिक्षकांत हाणामारी झाल्याच्या प्रकाराला त्यांनी दुजोरा दिला. पण विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण करणे याची आपल्याला कल्पना नाही. मात्र शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण हा प्रकार निंदनीय असल्याचे सांगत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT